‘ मला पुरुषांची गरज नाही ‘, आणखी एका अभिनेत्रीने केले स्वतःशीच लग्न

काही महिन्यांपूर्वी गुजरात येथील क्षमा बिंदू नावाच्या एका तरुणीने स्वतः सोबतच विवाह केला होता. आपल्या आयुष्यात आपल्याला पुरुषांची गरज नाही असे सांगत तिने ठरलेल्या मुहूर्ताच्या तीन दिवस आधीच स्वतःचे लग्न उरकून घेतले होते आणि त्यानंतर ती गोवा येथे हनिमूनला देखील गेली होती. एकीकडे तिच्या विवाहाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे असाच एक निर्णय छोट्या पडद्यावरील काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने घेतलेला आहे. कनिष्का सोनी असे या अभिनेत्रीचे नाव असून गळ्यात मंगळसूत्र आणि सिंदूर लावून ती स्वतःचे फोटो शेअर करत असते अशीच एक पोस्ट शेअर करून तिने आपण स्वतःशीच लग्न केलेले आहे असा गौप्यस्फोट केला त्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले.

स्वतःचा फोटो शेअर करत कनिष्काने म्हटले आहे की, ‘ मी स्वतःशी लग्न केलेले आहे. मी माझी स्वप्न स्वतः पूर्ण केलेली आहेत. मी फक्त स्वतःवर प्रेम करते म्हणून मला कोणत्याही पुरुषांची गरज नाही. मी एकटीच राहणार आहे. मी माझ्या गिटारसोबत खुश आहे. मी देवी आहे. मी बलवान आणि सामर्थ्यवान आहे. शिव आणि शक्ती माझ्यात सर्व काही आहे धन्यवाद.. ‘ असे लिहिल्यानंतर काही जणांनी तिचे कौतुक केले मात्र काही जणांनी तिला ट्रॉल करायला सुरु केले.

कनिष्काला ट्रॉल केल्यानंतर तिने म्हटले आहे की मला माहित आहे काही लोक माझ्या सेल्फ मॅरेज निर्णयावरून मला टोमणे मारत आहेत. मी भारतीय संस्कृतीवर विश्वास ठेवते. सर्व काही विचार करून मी एकटे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. लग्न हे केवळ लैंगिक संबंध ठेवण्यासाठी केले जात नाही. प्रेम आणि प्रामाणिकपणाच्या गोष्टी असतील तर लग्न होते. ही गोष्ट प्रत्येकाला हवी असते पण मी याबाबत आता विश्वास गमावलेला आहे. बाहेरच्या जगात प्रेम शोधण्यापेक्षा एकटे राहण्याचा निर्णय मी घेतलेला आहे. स्वतःवर प्रेम करणे चांगले आहे. मला हे सर्व करून काही बातमी निर्माण करायची नव्हती पण माझी पोस्ट ट्रेंड झाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते , असे देखील तिने पुढे म्हटलेले आहे.