
पाकिस्तानात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समुदायावर अत्याचाराची अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदाय अत्यंत दहशतीत जगत असून त्यातील काही जण भारतात आश्रित म्हणून दाखल झाले होते. त्यांना नागरिकत्व देण्याच्या घोषणा केंद्र सरकारच्या अनेक मंत्र्यांकडून करण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात काहीही कृती न झाल्याने सुमारे पंधराशे हिंदू पुन्हा पाकिस्तानात परतलेले आहेत. पाकिस्तानातून आलेल्या हिंदूंना आम्ही भारतात सामील करून घेऊ अशा अनेक घोषणा निवडणुकांच्या वेळी देण्यात आल्या मात्र प्रत्यक्षात काहीच कार्यवाही झाली नाही म्हणून अखेर हे हिंदू पुन्हा पाकिस्तानमध्ये परतलेले आहेत.
केंद्र सरकारचे परदेशातून आलेल्या निर्वासित नागरिकांना नागरिकत्व देण्याचे नियम अत्यंत कठोर असल्याने अनेक जण नागरिकत्वपासून वंचित राहत असून पाकिस्तानमध्ये शोषण आणि अत्याचार यांचा सामना करत हतबल झाल्याने पंधराशे हिंदू भारतात आले होते मात्र त्यांना नागरिकत्व देण्यात आले नाही म्हणून दीड वर्षात सुमारे पंधराशे हिंदूंनी पुन्हा पाकिस्तानची वाट धरलेली आहे.
जानेवारी 2021 पासून तर जुलै 2022 पर्यंत हे हिंदू पुन्हा पाकिस्तानात गेलेले असून भारतीय नागरिकत्वसाठी शुल्क म्हणून आकारली जाणारी रक्कम भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर इतरही कागदपत्रे यांची पूर्तता करण्यात त्यांना अपयश आले. हे पैसे भरले तरीदेखील नागरिकत्व मिळेल याची देखील खात्री नसल्याने गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून ते निर्वासितांचे जगणे जगत होते याउलट 2004 आणि 2005 साली आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये 13000 पेक्षा अधिक पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले आहे. केंद्रात भाजप सत्तेत आल्यानंतर तरी या हिंदूंना न्याय मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात तसे दिसून येत नाही तर केवळ निवडणुकीपुरतेच असे मुद्दे आणले जातात असे दिसून येत आहे.