‘ चौकशी गुंडाळून घेऊ अन तुम्हाला मुख्यमंत्री बनवू फक्त.. ‘, भाजपकडून खुल्ली ऑफर ?

शेअर करा

केंद्रातील सत्तारूढ भाजप पक्षाने आपल्याला भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिलेली असून तुम्हाला मुख्यमंत्री बनवू आणि तुमच्या पाठीमागे सुरू असलेली सीबीआय चौकशी गुंडाळून घेऊ , असे अनेक खळबळजनक दावे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केलेले आहेत. आपल्या विरोधातील आरोप हे धादांत खोटे असून कटकारस्थाने आणि भ्रष्ट लोकांसमोर आपण झुकणार नाही असे देखील त्यांनी ठणकावले आहे.

गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण असून आम आदमी पार्टी भाजपसमोर कडवे आव्हान उभे करत आहे त्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात असल्याची देखील जोरदार चर्चा आहे. अहमदाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलताना मनोज सिसोदिया यांनी सिसोदिया यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे.

मनीष सिसोदिया म्हणाले की, ‘ आम आदमी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा पहिला प्रस्ताव एक मध्यस्थ व्यक्ती भाजपकडून घेऊन आला होता. आम आदमी पार्टी सोडून आमच्या पक्षात या त्यानंतर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून तुमचा होत असलेला चौकशीचा ससेमिरा बंद करून टाकू अशी देखील ऑफर त्याने दिली होती तर दुसर्‍या एका प्रस्तावात आम आदमी पार्टीला सोडचिठ्ठी दिली तर राज्याचा मुख्यमंत्री बनवू असेदेखील वचन भाजपने दिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आपले गुरू आहेत. त्यांच्याकडून आपण राजकारणाचे धडे शिकलेलो आहोत. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बनण्यासाठी आम आदमी पार्टीत मी प्रवेश केलेला नाही असे उत्तर आपण भाजपला दिले असेही ते म्हणाले.

आपण महाराणा प्रताप यांचे वंशज आहोत. स्वतः राजपूत आहोत. शिरच्छेद झाला तरी चालेल पण भ्रष्ट लोक आणि असे कटकारस्थाने रचणाऱ्या लोकांच्या समोर आपण झुकणार नाही असेदेखील त्यांनी पुढे ठणकावले. दुसरीकडे दिल्लीतील शाळा आणि शिक्षणाचा दर्जा उंचावला याबद्दल दिल्लीतील शिक्षण मॉडेलचे चक्क न्यूयॉर्क टाइम्सने कौतुक केले होते. न्यूयार्क टाइम्सने केलेले कौतुक ही जाहिरात होती असा दावा भाजपच्या आयटी सेल कडून करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात त्यात तथ्य आढळून आले नाही. शिक्षणमंत्री मनोज सिसोदिया यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली असून गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मनीष सिसोदिया यांना आणि आपल्याला देखील अटक केली जाईल अशी भीती अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. सरकारी अहंकाराचे नुकसान गुजरातची जनता सध्या सहन करत आहे असेही केजरीवाल म्हणाले.


शेअर करा