‘ त्या ‘ प्रकरणावरून नवनीत राणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद , कुटुंबीय म्हणतात की..

अमरावती येथील पोलीस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांना खडे बोल बजावणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात राजापेठ पोलिस ठाण्यात शनिवारी रात्री अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. आपली सामाजिक बदनामी नवनीत राणा यांनी केली त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी या प्रकरणाला दुजोरा दिलेला आहे.

अमरावती येथील एका मुलीचे एका विशिष्ट धर्मीय मुलाने अपहरण केलेले आहे आणि हा लव्ह जिहादचा प्रकार आहे असा आरोप करून नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर चांगलाच वाद घातलेला होता त्यानंतर पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली त्या वेळी ही तरुणी घरातील वैयक्तिक वादातून निघून गेली होती आणि सातारा येथून तिला ताब्यात घेण्यात आले.

पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर या मुलीने आपले कोणीही अपहरण केलेले नाही आपल्या घरगुती वादातून आपण निघून गेलो होतो असे सांगितले असल्याने नवनीत राणा यांची याप्रकरणात चांगलीच फसगत झालेली आहे. नवनीत राणा यांनी केलेल्या या आरोपानंतर या मुलीची देखील सामाजिक माध्यमात जोरदार चर्चा झाली त्यामुळे आपला मुलगा आणि आपले कुटुंबीय यांना घराबाहेर पडणे देखील मुश्कील झाले आहे असे सांगत नवनीत राणाने सांगितलेल्या मुलाशी आमच्या मुलीचा कुठलाही संबंध नाही मात्र तरीदेखील त्यांनी आमची बदनामी केली, असा आरोप करत नवनीत राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.