‘ बारामती टार्गेट ‘ वरून जयंत पाटील यांनी भाजपाला सुनावले , म्हणाले की..

एखाद्याचा अश्‍वमेध रोखल्यानंतर जो त्रास होतो तो त्रास शरद पवार यांच्या बाबतीत बारामतीत भाजपला होत आहे, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपला लावलेला आहे. 2024 च्या निवडणुकीत बारामतीमध्ये भाजपचा विजय होईल असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत दौऱ्यावर असताना केलेला होता त्याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल पण बारामती पवारांना सोडणार नाही इतकं त्यांचं नातं घट्ट आहे. बारामतीत उमेदवार कोणाचा द्यायचा हे भाजप ठरवेल म्हणून सध्या भाजपने बारामती टार्गेट केले आहे. आम्ही सर्वात मोठ्या लोकांना टार्गेट करतो आहे अशी हवा भाजप करत असून आमच्याकडे ही टारगेट आहे. आम्ही पुन्हा कोणाला टार्गेट करतोय हे लवकर तुमच्या लक्षात येईल, असेही ते पुढे म्हणाले .