कलम 370 वरून गुलाम नबी आझाद यांचे घुमजाव , कबुली देताना म्हणाले की ..

कॉंग्रेसला रामराम ठोकलेले गुलाम नबी आझाद हे जम्मू काश्मीर येथे आपल्या स्वतंत्र पक्षाची लवकरच घोषणा करणार असून अद्यापपर्यंत पक्षाचे नाव ठरलेले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी कलम 370 काश्मीरमध्ये पुन्हा लागू करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले होते मात्र त्यानंतर त्यांनी संसदेत दोन तृतीयांश बहुमत असलेले सरकार कलम 370 ची पुनर्स्थापना करू शकते ते आता शक्य होणार नाही असे सांगत आपल्या पक्षाकडून हे होणार नाही याचीही कबुली दिली आहे.

गुलाम नबी आझाद हे सध्या नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असून त्यांनी काश्मीर खोऱ्यात ही रॅली काढली होती त्यावेळी ते म्हणाले की, ‘ मी किंवा काँग्रेस पक्ष किंवा इतरही प्रादेशिक पक्ष कोणीही तुम्हाला आता कलम 370 परत देऊ शकत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा ममता बॅनर्जी कोणीही कलम 370 पुन्हा प्रस्तावित पुन्हा प्रस्थापित करू शकत नाही. काँग्रेस पक्ष गेल्या दहा वर्षाच्या लोकसभा निवडणुकीत 85 पेक्षा जास्त जागा मिळवू शकलेला नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असे मला वाटत नाही त्यामुळे आता कलम 370 पुन्हा येणे शक्य नाही, असेदेखील ते म्हणाले.