दुचाकीच्या आरशातून न्याहाळत मुलीला दिला त्रास , न्यायालय म्हणाले ..

अल्पवयीन मुलींची छेडछाड करण्याचे प्रकार पूर्ण राज्यभरात सुरू असून अनेकदा नागरिक नाहक त्रास नको म्हणून आरोपीच्या विरोधात तक्रार देण्यास टाळाटाळ करतात मात्र एकदा तक्रार दाखल झाली की पोलिस देखील योग्य रीतीने काम करत असून असेच एक प्रकरण संगमनेर इथे समोर आलेले आहे . एका 17 वर्षीय मुलीचा वारंवार पाठलाग करणे तिचा मोबाईल मिळवून त्यावर अश्लील संदेश पाठवणे, दमदाटी करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे यावरून एका 23 वर्षीय युवकाला सहा महिन्यांचा कारावास आणि पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अक्षय प्रमोद पराड ( वय 23 ) असे त्याचे नाव असून मनोली येथील तो रहिवासी आहे. संगमनेर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा तो वारंवार पाठलाग करत होता. मुलीने सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले मात्र त्याने तिला त्रास देणे सुरुच ठेवले. काही कालावधीनंतर आरोपीने तिचा मोबाईल नंबर मिळवला आणि त्यावर तिला अश्लील संदेश पाठवत त्रास देऊ लागला. रस्त्यावर पुढे जाऊन दुचाकीच्या आरशातून सातत्याने तिच्याकडे एकटक लावून पाहणे असे देखील प्रकार त्याने केले त्यामुळे ही मुलगी वैतागून गेली होती. एप्रिल 2019 मध्ये तिने आश्वी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक यांनी या प्रकरणी सविस्तर तपास करत आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी अभियोक्ता म्हणून कामकाज पाहताना संजय वाघचौरे यांनी जोरदार युक्तिवाद केला त्यामध्ये त्यानंतर या प्रकरणात पीडित मुलीची साक्ष देखील महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाचा दावा म्हणून आरोपी पराड याला सहा महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आलेला आहे.