‘ मला आईला मिठी मारायची आहे ‘, विधीला न्यायालय म्हणाले ..

काही वर्षांपूर्वी मुंबई येथे शीना बोरा हत्याकांड चांगलेच चर्चेत आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली इंद्राणी मुखर्जी हिची मुलगी विधी हिने बुधवारी सीबीआय न्यायालयाला आपल्या आईला मिठी मारण्याची परवानगी आपल्याला द्यावी अशी तोंडी विनंती केली आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने विधी हिला इंद्राणीसोबत राहण्यास नकार दिलेला होता म्हणून तिने ही विनंती केलेली आहे.

अर्जामध्ये विधीने म्हटले होते की, 2015 मध्ये आईला अटक करण्यात आली त्यावेळी आपण अल्पवयीन होतो. गेल्या सात वर्षांपासून आईच्या प्रेमापासून आणि तिच्या सहवासापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आलेले आहे. मे महिन्यात इंद्राणीची जामिनावर सुटका करण्यात आली मात्र कोणत्याही साक्षीदारांची संपर्क न करण्याची अट तिला सर्वोच्च न्यायालयाने घातली होती असे सांगत विधी हीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विधी ही इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांची मुलगी आहे. पीटर मुखर्जी याच्याआधी इंद्राणीचा संजीव खन्ना सोबत विवाह झालेला होता. संजीव खन्ना हादेखील शीना बोरा हत्याकांड आरोपी आहे.