‘ कसं जगायचं ? ‘ वाहतुकीच्या नवीन नियमावलीचा फटका , रिक्षाचालकाची आत्महत्या

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून देशात कोरोना संकटानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे अर्थकारण बिघडलेले पाहायला मिळत असून अनेक जणांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. कोरोना काळात झालेले कर्ज फेडण्यात अनंत अडचणी येत असून कुटुंबाची उपजीविका कशी करायची हाच अनेक जणांना पुढे प्रश्न आहे तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्तर प्रदेश येथे कानपूर परिसरात एक दुर्दैवी अशी अशी घटना समोर आलेली आहे.

सुनील गुप्ता नावाच्या एका इसमाने कोरोना संकटानंतर नोकरी केल्यानंतर आता काय करावे असा विचार करत अखेर रिक्षा घेतली आणि ती चालवण्यास सुरू केले. कानपूरमध्ये रिक्षा चालवत असताना वाहतूक पोलिसांच्या नियमाचा फटका त्यांना बसला आणि त्यांनी तब्बल12 हजार रुपयांची पावती फाडली. सुनील गुप्ता यांच्या नावावर या आधी देखील दहा हजारांची पावती फाडण्यात आली होती. रिक्षा चालवून देखील पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने सुनिल आधीपासूनच चिंतेत होते त्यात बावीस हजार रुपये कसे भरायचे या तणावात त्यांनी अखेर आत्महत्या केलेली आहे.

वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन नियमावलीमुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हातावर पोट असणार्‍या सुनील गुप्ता यांना तब्बल बावीस हजार रुपये सरकार दरबारी जमा करणे होते. घरात एक लहान मुलगी आणि पत्नी इतकाच त्यांचा संसार असून हातावर पोट असल्याने रोज रिक्षा चालून ते त्यातून आपल्या कुटुंबाची उपजीविका करत होते. वाहतूक विभागातील कर्मचारी सध्या सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोबाइल याच्या माध्यमातून दंडात्मक कारवाया करत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात चलन कापल्याने सुनील गुप्ता यांनी अखेर आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.