शाळा सुटताच अल्पवयीन मुलीला घेऊन फरार , नातेवाईकांनी पाठलाग केला अन..

नगर येथे एक खळबळजनक घटना समोर आलेली असून जिल्ह्यातील राहता येथे दवाखान्यात घेऊन जातो अशा बहाण्याने एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुलीचे नातेवाईक आणि खडकेवाके येथील ग्रामस्थांनी अक्षरशा: पाठलाग करून आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, 14 तारखेला सकाळी अकराच्या सुमारास राहता शहरातील शारदा विद्यालय ही शाळा सुटल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलगी खडकेवाके रोडने सायकलवरून घरी जात असताना आरोपी अनिल वसंत लोंढे ( राहणार अस्तगाव ) हा तिथे आला आणि त्याने तिला दवाखान्यात घेऊन जातो असे म्हणून अनैतिक कृत्यासाठी पळवून नेले.

परिसरातील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि मुलीचे नातेवाईक यांना सदर प्रकरणी खबर देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत इतर ग्रामस्थांच्या मदतीने आरोपीचा पाठलाग सुरू केला आणि त्याला पकडले. राहता पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असल्याचे समजते .