नाशिक हादरलं..अल्पवयीन मुलीवर डॉक्टरचा बलात्कार ?

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना नाशिक येथे समोर आली असून नाशिकच्या अंबड परिसरात एका डॉक्टरने अल्पवयीन असलेल्या परिचारिकेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आलेला आहे. अल्पवयीन मुलीने पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपीच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत तसेच इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर उल्हास कुटे असे आरोपीचे नाव असून मोरवाडी येथील खाजगी रुग्णालयात हा प्रकार घडलेला आहे. उल्हास कुटे याने पीडितेच्या रूममध्ये प्रवेश करत असताना माझे हात पाय दुखत असल्याने मी इथे आलेलो आहे असे सांगून तो खोलीमध्ये आला त्यानंतर त्याने पिडीतेच्या शरीराला स्पर्श करत तिच्यावर बळजबरी केली आणि शारीरिक अत्याचार केला असे मुलीचे म्हणणे आहे.

आपल्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर संशयित आरोपी कुटे याने तरुणीला धमकी दिली तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर तुला कामावरून काढून टाकेल असे देखील धमकावले. तरुणीने याप्रकरणी तिच्या घरच्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर अखेर पोलिसात धाव घेतली. अंबड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे समजते.