दुसऱ्या बहिणींना कोंडून ठेवले अन मग घरात आला.. , पिडीता म्हणतेय की..

महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून शेवगाव येथे एका मुलीच्या बहिणींना दुसऱ्या खोलीत कोंडून तलवारीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या.

उपलब्ध माहितीनुसार, चार तारखेला रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला असून घरामध्ये असलेल्या दुसऱ्या बहिणींना कोंडून कडी लावून तलवारीचा धाक दाखवत तिला जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने तिच्यावर अत्याचार केलेला आहे. ‘ तु मला आवडतेस माझ्यासोबत लग्न कर.. लग्न केले नाही तर तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल ‘ अशी देखील धमकी त्याने दिली असे पीडित मुलीचे म्हणणे आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत 28 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.