सोळा महिन्यांपूर्वी मयत व्यक्तीला कोरोनाचा दुसरा डोस , मुलगा म्हणतोय की..

एक वेगळेच प्रकरण सध्या बिहार इथे चर्चेत आले असून बिहारच्या आरवली जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी चक्क मयत व्यक्तिला कोरोना डोस दिल्याची नोंद केलेली आहे. ज्या व्यक्तीला कोरोना डोस दिला त्या व्यक्तीचे आधीच निधन झालेले आहे त्यानंतर मयत व्यक्तीच्या मुलाने कागदपत्रे दाखवात जिल्हा शल्य चिकित्सक यांना जाब विचारला मात्र त्यांच्याकडे यासंदर्भात कुठलेही उत्तर नव्हते अखेर त्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊन चौकशीची मागणी केली आहे.

कुर्था प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार उघडकीला आला असून मयत व्यक्तीचे नाव रामाधर महातो असे असल्याचे समजते. त्यांचा मृत्यू होऊन सोळा महिने उलटून गेले असून आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कोरोना लसीचा दुसरा डोस देखील दिलेला आहे. मयत व्यक्तीच्या मोबाईलवर यासंदर्भात मेसेज आला त्यावेळी तो देखील गडबडून गेला. घरातील लोक देखील या प्रकाराने हैराण झाले आणि ते महातो यांचे मृत्यू प्रमाणपत्र घेऊन सरकारी कार्यालयात गेले.

आपल्या वडिलांचा मृत्यू झालेला असून त्यानंतर सोळा महिन्यांनी त्यांना लस दिल्याचा मेसेज कसा आला असा त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना विचारला त्यावेळी त्यांनी काही उत्तर दिले नाही. संतप्त झालेल्या मुलाने कोरोना लस देण्यासाठी तुम्ही स्वर्गात गेला होतात का ? असा देखील खडा सवाल विचारला. बिहार इथे आधीही सरकारी कर्मचारी लसीचा काळाबाजार करत असल्याचे प्रकार समोर आले असून जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत