विषारी साप पाच वेळा चावूनही तरुण ठणठणीत , डॉक्टर म्हणतात की ..

देशात एक वेगळंच असं प्रकरण सध्या समोर आलेल असून उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका 20 वर्षीय तरुणाला विषारी साप तब्बल पाच वेळा चावला मात्र तरीदेखील उपचार केल्यानंतर तो ठणठणीत झालेला आहे. रजत चहर असे या तरुणाचे नाव असून या आगळ्यावेगळ्या घटनेची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.

उपलब्ध माहितीनुसार,मालपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रजत हा पदवीचे शिक्षण घेत असून त्याचे वडील यांनी विषारी साप आपल्या मुलाच्या डाव्या पायाला कायम चावत आहे. दहा दिवसात तब्बल पाच वेळा या सापाने त्याचा चावा घेतला. सहा सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घराबाहेर जात असताना साप आला आणि त्याने आपल्या पायाचा चावा घेतला त्यानंतर तो तिथून सरपटत जाताना दिसला त्यानंतर अकरा तारखेला घरातील खोलीत 13 तारखेला बाथरूममध्ये आणि 14 तारखेला बूट घातले असताना देखील सापाने चावा घेतला असेही या तरुणाचे म्हणणे आहे.

तरुणाने पुढे म्हटले आहे की सुरुवातीला प्राथमिक उपचार घरीच केल्यानंतर मला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते मात्र त्यावेळी डॉक्टरांनी माझ्यामध्ये सर्पदंशाची कुठलीही लक्षणे दिसून आलेले नाही असे म्हटले आणि चार तासानंतर मला घरी पाठवले. वेळोवेळी आपला आपल्याच पायावर साप चावत असल्याने आपण घाबरून गेलो आहोत आणि संपूर्ण परिवार दहशतीत आहे असे देखील त्याने म्हटले आहे.