गोलाणी मार्केटच्या ‘ त्या ‘ प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप

शेअर करा

दोन वर्षांपूर्वी जळगाव येथील गोलाणी मार्केट येथे तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका दहा वर्षाच्या मतिमंद मुलीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. 10 जुलै 2020 रोजी ही घटना गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यांवर भर दिवसा घडलेली होती. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ वासुदेव खर्डीकर ( वय 26 राहणार राधाकृष्ण नगर ) याला जिल्हा सत्र न्यायालयाने वीस वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार 10 जुलै 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडलेला होता. प्रकरण उघडकीला आले त्यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याचे आढळून आले तसेच त्यानंतर आरोपीच्या विरोधात पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

विशेष न्यायाधीश बी एस महाजन यांच्या न्यायालयात हा खटला चालला त्यावेळी सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी तब्बल सोळा साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी तसेच आरोपीचे रेखाचित्र काढणारे चित्रकार आणि सीसीटीव्ही फुटेज हे महत्त्वाचे पुरावे समोर आले. न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्मठेप तसेच ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत वीस वर्ष कारावास आणि 70 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावलेली आलेली असून दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत.


शेअर करा