आंटीच्या ‘ त्या ‘ प्रकाराची पोलिसांना कुणकुण लागली आणि त्यानंतर..

कोरोना काळात राज्यात वेश्याव्यवसाय संथ पडलेला होता. कोरोना निर्बंध बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा वेश्याव्यवसायाने दुर्दैवाने डोके वर काढण्यास सुरुवात केली असून अशीच एक घटना उस्मानाबाद शहरात समोर आलेली आहे. एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी आठच्या सुमारास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली त्यावेळी हॉटेल चालक महिला आणि हॉटेलच्या मालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तब्बल चार महिलांची या ठिकाणावरून सुटका करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या या हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला लागलेली होती. हॉटेल सरिता असे या हॉटेलचे नाव असून पोलिसांनी सुरुवातीला बनावट ग्राहक पाठवून या प्रकाराची खात्री केली आणि त्यानंतर लगेच हॉटेलवर छापा टाकला त्यावेळी तिथे एका खोलीत चार महिलांना वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवल्याचे समोर आले.

आरोपींची चौकशी केली असता एकूण पन्नास वर्षीय हॉटेलचालक हा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने या महिलांना आपल्या हॉटेलमध्ये ठेवून घेत होता आणि त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत पैसे कमवत होता तर सोबतच हॉटेल चालक असलेली महिला हीदेखील या पैशाच्या कमिशनवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती असेही समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाने तिच्या ताब्यातील एक मोबाईल आणि 4500 रुपये हस्तगत केले आहेत तर दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.