पुणे हादरलं..पुण्यात स्पर्धा परिक्षेची करत होता तयारी अन अचानक..

पुणे शहरात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी येऊन आज ना उद्या आपल्याला सरकारी नोकरी भेटेल या आशेने अहोरात्र प्रयत्न करत असतात . अनेकदा परीक्षेत अपेक्षित असे यश न आल्याने हे विद्यार्थी नैराश्यात देखील जातात अशीच एक घटना पुण्यात उघडकीला आलेली असून एका तरुणाने स्पर्धा परीक्षेच्या दबावामुळे आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहलेली असून त्यामध्ये आत्महत्येचे कारण सांगितलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, त्रिगुण कावळे असे मयत तरुणाचे नाव असून एमपीएससीची परीक्षेची तयारी करण्यासाठी तो पुण्यामध्ये राहत होता. 2022 मध्ये त्याने महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली होती. मयत तरुण मूळचा जालना जिल्ह्यातील रहिवासी असून जानेवारी 2019 पासून पुण्यातील गांजवे चौक येथे राहत होता.

दुपारच्या सुमारास त्याने खोलीमध्ये कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये आपण नैराश्यातून आत्महत्या करत आहोत असे म्हटले आहे. एमपीएससीची कठीण परीक्षा पास करणे हे मोठे आव्हान अनेक विद्यार्थ्यांसमोर असते .

अभ्यासासाठी ग्रामीण पातळीवर चांगल्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक गोरगरीब कुटुंबातील तरुण देखील पुण्याच्या दिशेने धाव घेतात मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. इतके सगळे होऊन देखील एमपीएससी परीक्षेत यश आल्यावर देखील त्यांच्या नियुक्त्या लवकर होत नाही त्यामुळे शिक्षणासाठी केलेला खर्च आणि पुण्यातील महागडे क्लासेस यामुळे आर्थिक अडचणीत अनेक विद्यार्थी सापडतात आणि त्यातून नैराश्यात जातात. त्रिगुण कावळे त्याच्या आत्महत्येने एमपीएससीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.