‘ तो ‘ आला अन विवाहितेवर गोळी चालवून गेला , रुग्णालयात नेले पण..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कारला येथे उघडकीला आलेली असून एका 20 वर्षीय विवाहित तरुणीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचा प्रकार रविवारी संध्याकाळी घडलेला आहे. जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना रात्री आठच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली आहे

उपलब्ध माहितीनुसार, काजल मनोज शिंदे ( वय 20 ) असे मयत तरुणीचे नाव असून काही वर्षांपूर्वी तिचा विवाह झालेला होता मात्र त्यानंतर ती तिच्या आई-वडिलांकडे राहायला होती. रविवारी संध्याकाळी तिच्यावर गोळीबार करण्यात आला त्यातील बंदुकीची एक गोळी तिच्या छातीवर लागली आणि ती जागीच कोसळले. तिच्या कुटुंबियांनी तिला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रूग्णालयात दाखल केले होते मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे तिच्यावर उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता तिचा मृत्यू झाला. मयत तरुणीवर गोळी कोणी झाडली हे अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत .


शेअर करा