तब्बल चौदा वर्षे बोगस महिला वकिलाने केली कोर्टात प्रॅक्टिस , ‘ असा ‘ झाला घोळ अन..

शेअर करा

एक वेगळेच प्रकरण मुंबईत समोर आलेले असून मुंबई येथे गेली चौदा वर्ष कायद्याची प्रॅक्टिस करणाऱ्या 72 वर्षीय बोगस महिला वकीलाला बीकेसी पोलिसांनी अटक केलेली आहे. सदर महिला ही वांद्रे पश्चिम पाली हिल येथील रहिवासी असून मंदाकिनी सोहिनी असे तिचे नाव आहे. अनेक न्यायालयात आपण प्रॅक्टिस केलेली आहे असे देखील तिने सांगितले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, एका खटल्यादरम्यान पोलिसांनी हिला ओळखपत्र पडताळून पाहण्यासाठी 15 जुलै रोजी कार्यालयात बोलावले होते मात्र ती हजर झाली नाही. शनिवारी मंदाकिनी हिने पोलीस ठाण्यात जाऊन तिची पदवी आणि आधार कार्ड सादर केले त्यावेळी अधिकाऱ्यांनी तिची विश्वासार्हता पडताळून पाहिली त्यावेळी कायद्याचा सराव करण्याचा परवाना बनावट आढळून आला .वांद्रे न्यायालयाने 20 सप्टेंबरपर्यंत आरोपी महिलेला पोलिस कोठडी सुनावली असून 1977 मध्ये लॉ कॉलेजमध्ये सरकारी कायद्याच्या द्वितीय वर्षाचे शिक्षण तिने घेतलेले आहे मात्र तिच्याकडे वैध स्वरूपाची पदवी नाही तरीदेखील ती मुंबईतील वेगवेगळ्या न्यायालयात प्रॅक्टिस करत होती असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे .


शेअर करा