पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्याप्रमाणे , तो जशी घरातील भांडी ..

वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अवस्था दारुड्या माणसासारखी झालेली असून ज्या पद्धतीने तो दारू पिण्यासाठी रोज घरातील एक एक वस्तू विकतो तशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी एक एक सरकारी कंपनी खाजगी गुंतवणूकदारांच्या घशात घालत आहेत अशी टीका केलेली आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी यांच्यावर ही टीका केलेली आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

कोण दोषी कोण निर्दोष हे न्यायालयाला ठरवू द्या माझं ईडीला इतकंच म्हणणं आहे की तुम्हाला कुणाला पकडायचा असेल तर पकडा पण त्याचा दोन महिन्यात एफआयआर रिपोर्ट हा कोर्टात गेला पाहिजे. तुम्ही केलेला तपास किती खरा किती खोटा हे कोर्टाला ठरू द्या पण कोणत्याही सुनावणीशिवाय किंवा गुन्हा सिद्ध केल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला चार पाच महिने तुरुंगात ठेवणे याला घटना मान्यता देत नाही.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी दोन महिन्यांपूर्वी सादर केलेला अहवाल सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा असून त्यांनी म्हटले आहे की अंदाधुंद पद्धतीने तुम्ही सरकारी मालमत्ता विकत आहात ते देशाच्या हिताचे नाही. अगदी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर दारुड्याला जर दारू पिण्यासाठी पैसे मिळाले नाही तर तो घरातली भांडी विकायला सुरू करतो. पंतप्रधान मोदी देशाचे पंतप्रधान जरी असले तरी त्यांची वागणूक ही दारुड्यासारखीच आहे हे मी दोन वर्षांपूर्वी बोललो होतो आणि रिझर्व बँकेने देखील त्याला आता पुष्टी दिलेली आहे.