भांडी घासत असताना घरासमोरून चकरा मारत होता , हटकले तर म्हणतोय की ?

नगर जिल्ह्यातील राहुरी सध्या बनावट औषधे, मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक प्रकरणी चांगलीच चर्चेत आलेली असून पुन्हा एकदा राहुरीत एक खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे. एका अल्पवयीन मुलीची छेडछाड करण्यात आल्यानंतर या मुलीने शाळेत जाणे बंद केले होते. 22 तारखेला हा तरुण एका त्या मुलीच्या घरासमोर चकरा मारत होता त्यावेळी मुलीच्या आईने त्याला जाब विचारला म्हणून त्याने मुलीच्या आईला मारहाण केली. पोलिस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या रोडरोमियोची चांगलीच धुलाई केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विशाल दत्तात्रय नेहे ( राहणार येवले आखाडा ) असे आरोपीचे नाव असून तो गेल्या काही महिन्यांपासून अवघ्या बारा वर्षीय मुलीची ये-जा करत असताना सतत छेडछाड करत होता. त्याच्या भीतीने या मुलीने अक्षरशः शाळेत जाणे देखील बंद केले होते . 22 तारखेला दुपारी मुलगी आणि आई घरासमोर भांडी धूत असताना हा तिथेच चकरा मारत होता त्यावेळी त्याला मुलीच्या आईने त्याला जाब विचारला म्हणून त्यांनी आईला देखील शिवीगाळ केली.

मुलीने त्यावेळी हाच तो मला शाळेत जाताना त्रास देतो असे आईला सांगितले म्हणून आईने त्याला माझ्या मुलीला त्रास का देतो असा प्रश्न विचारला त्यावेळी याने मुलीच्या आईला अश्लील भाषेत उत्तरे दिली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माझ्या नादी लागाल तर एकेकाचा काटा काढीन असे देखील तो म्हणाला त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसात धाव घेतली आणि आरोपीच्या विरोधात 354 323 504 506 आणि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.