कपाळाला हात..अवघ्या वीस दिवसात नववधू दिरासोबत फरार

देशात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून उत्तर प्रदेशातील पिलिभित जिल्ह्यातील हे प्रकरण आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी नववधू म्हणून सासरी आलेली महिला आपल्या दिराच्या प्रेमात पडलेली असून अवघ्या वीस दिवसात तिने दिरासोबत घरातून धूम ठोकलेली आहे. अंगावरची हळद फिटली नव्हती अशातच तिने हा प्रकार केल्यानंतर सासरच्या मंडळींनी कपाळाला हात लावलेला आहे.

पतीच्या म्हणण्यानुसार , सदर महिला ही तिचा दीर असलेल्या व्यक्ती सोबत पळून गेलेली असून लग्न झाल्यापासून हा चुलत दीर सातत्याने आपल्या घरी येत असायचा त्यावेळी बायकोची चेष्टामस्करी करत असायचा मात्र त्यांच्या गमतीशीर गप्पाकडे आपण लक्ष दिले नाही आणि त्यांच्या मनात काय चालले आहे याचा आपल्याला अंदाज आला नाही ,’ असे म्हटले आहे.