निर्भयाची पुनरावृत्ती ? पोत्यात महिला आढळली तेव्हा चक्क..

देशात एक खळबळजनक असे प्रकार प्रकरण समोर आले असून उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे झालेली असून दिल्ली येथील रहिवासी असलेल्या एका 38 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे आहे. सदर महिला बलात्कार केल्यानंतर पोत्यात बांधलेल्या अवस्थेत रस्त्याच्या बाजूला आढळून आली आली त्यावेळी तिच्या गुप्तांगात रोड घातल्याचे भयावह चित्र होते.

उपलब्ध माहितीनुसार, सदर महिला ही 16 ऑक्टोबर रोजी तिच्या भावाच्या वाढदिवसासाठी म्हणून गाजियाबाद येथे गेली होती. तेथून परतत असताना रिक्षाची वाट पाहत असताना चार जणांनी तिचे कारमधून अपहरण केले आणि त्यानंतर दोन दिवस तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिचा अतोनात छळ केला . महिलेची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती समोर आली असून सदर आरोपी हे महिलेच्या ओळखीतले असून मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती माने यांनी हा प्रकार दिल्लीतील निर्भया प्रकरणाची जाणीव करून देणारा आहे असे सांगत पोलिसांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार संशयितांना अटक केली असून सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे . बुलडोजर कारवाई करून आपली पाठ थोपटून घेणारे सरकार महिला अत्याचारावर महिला आयोगाच्या आदेशानंतरच कामाला लागते का ? यावरही जोरदार टीका केली जात आहे.