लक्ष्मीपूजनावरून भाजप आमदाराच्या ‘ त्या ‘ विधानाची जोरदार चर्चा

शेअर करा

सध्या देशात दिवाळी उत्सव मोठ्या थाटात सुरू असून बिहारमधील भागलपुरचे भाजप आमदार ललन पासवान यांनी धार्मिक रूढी आणि परंपरा यांच्या संदर्भात एक वक्तव्य केले असून त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. पासवान यांनी आपण मानलं तर देव असतो नाही तर तो दगड असतो. जेव्हा लोक तर्काच्या आधारावर विचार करतील तेव्हा देशातून अंधश्रद्धा संपून जाईल असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काही संतप्त लोकांनी त्यांचा पुतळा देखील दहन केलेला आहे

आमदार पासवान काय म्हणाले ?

जोपर्यंत लोक आत्मा परमात्मा अशा गोष्टींमध्ये विश्वास ठेवतील तोपर्यंत ते अंधश्रद्धेच्या चक्रात अडकतील पण जेव्हा लोकांची क्षमता वाढेल त्या वेळी ते रूढी परंपरा ऐवजी तर्काच्या आधारावर या गोष्टींकडे पाहतील आणि त्यांचे विचार वैज्ञानिक आणि सामाजिक होतील तेव्हा ते आपल्यासारखे वागतील .

हिंदू धर्मामध्ये सरस्वती ही विद्येची देवता मानले जाते पण मुस्लीम बांधव सरस्वतीची पूजा करत नाहीत म्हणून ते विद्वान नसतात का ? आयएएस आणि आयपीएस ऑफिसर देखील ते नसतात का ? लक्ष्मी देवी ही संपत्तीची देवता मानली जाते म्हणून दिवाळीत लक्ष्मीदेवीची पूजा केली जाते त्यामुळे धन मिळेल अशी अपेक्षा धरली जाते मात्र मुस्लीम बांधव लक्ष्मीची पूजा करत नाहीत तरीही ते कोट्याधीश आहेत.

मुस्लिम आणि इतर धर्माचे लोक हनुमानाची पुजा करत नाहीत. अमेरिकेत हनुमानाचे कुठलेही मंदिर नाही तसेच हनुमानाची देखील तिथे पूजा केली जात नाही तरीदेखील अमेरिका हे शक्तिशाली राष्ट्र आहे हे सर्व काही मानण्यावर आहे. आपण मानलं तर दगडात देव असतो अन्यथा तो दगड असतो जसजसे तुम्ही तर्काच्या आधारावर विचार करायला शिकाल तशी तुमच्यात वैचारिक प्रगल्भता येत जाईल.


शेअर करा