भारतीयांना दिला ‘ हा ‘ देश सोडण्याचा सल्ला

शेअर करा

गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाची तीव्रता भीषण होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना लवकरात लवकर यूक्रेन सोडून पुन्हा देशात परतण्याचा सल्ला भारतीय दूतावासाकडून देण्यात आलेला आहे. युक्रेन येथील भारतीय दूतावासाने यासंदर्भात दिशानिर्देश जारी केलेले असून युक्रेनवर रशियाच्या भीषण हल्ल्यानंतर पाणी आणि वीज कपात करण्याची वेळ आलेली आहे.

युक्रेन येथील सुरक्षा परिस्थिती बिकट होत चाललेली असून भारतीय नागरिकांना युक्रेनचा दौरा न करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे सोबतच अद्यापही जे काही भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून आहेत त्यांना लवकरात लवकर युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे चित्र असून अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या कठीण परिस्थितीतून भारतात आणण्यात आले होते. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याऐवजी त्यांना दुसऱ्या देशात जाऊन शिकण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान देखील झालेले आहे.

रशिया युक्रेन युद्धात वीज यंत्रणा कोलमडत असल्यामुळे वीज कपातीसाठी निश्चित असा वेळ जाहीर करण्यात आलेला नाही मात्र मोठ्या प्रमाणात मेट्रो आणि ट्रॉली विजेवर चालत असल्याने वाहतूक व्यवस्था देखील कोलमडलेली पाहायला मिळत आहे. वीजनिर्मिती केंद्रे पुन्हा पूर्ववत करण्यासाठी युक्रेनचे इंजिनियर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत.


शेअर करा