खरोखरच ‘ ते’ तृतीयपंथी होते का ? इथपासून होणार पोलिसांचा तपास

महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण मुंबईत समोर आले असून तीन वर्षाच्या चिमुकल्याला एका महिलेच्या हातातून ओढून नेण्याचा प्रकार समोर आलेला आहे . कांदिवली पूर्व येथे लोखंडवाला टाउनशिपमध्ये ही घटना उघडकीला आली असून संतप्त झालेल्या आईने तृतीयपंथी व्यक्तीपासून आपल्या बाळाला प्रतिकार करत वाचवले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, दीप्ती चंद्रकांत जोशी ( वय 39 ) असे या महिलेचे नाव असून बुधवारी दुपारी त्या रस्त्यावरून जात असताना त्यांच्यासोबत त्यांचा तीन वर्षांचा मुलगा होता त्यावेळी तीन तृतीयपंथी व्यक्तींनी तिथे येऊन त्यांच्या जवळून मुलगा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हे तीनही जण पळून गेले. सदर व्यक्ती हे तीनही तृतीयपंथी होते असा दावा जोशी यांनी केलेला आहे.

दीप्ती जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे दोन व्यक्तींनी माझे हात धरले आणि तिसऱ्या व्यक्तीने माझ्यापासून माझ्या मुलाला हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी मला कानाखाली मारल्या आणि ‘ आम्ही काहीही करुन तुझ्या मुलाला घेऊन जाऊ ‘ असे देखील म्हटले आणि मला फरफटत नेले मात्र मी मुलाला घट्ट धरून ठेवलेले होते त्यानंतर मी आरडाओरडा सुरू केला त्यावेळी परिसरातील दोन तीन जणांनी तिथे धाव घेतली त्यावेळी हे तृतीयपंथी व्यक्ती पळून गेले . समतानगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने त्यांचे चेहरे दिसून आले नाहीत मात्र सदर व्यक्ती हे तृतीयपंथी खरोखरच होते का ? याचादेखील पोलीस आता शोध घेत आहेत.