.. म्हणून हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा , प्रशासन म्हणतेय की ?

देशात एक खळबळजनक अशी घटना राजस्थानातील बारां जिल्ह्यात उघडकीला आली असून सवर्ण समाजातील लोकांनी मारहाण केल्यामुळे सुमारे अडीचशे लोकांच्या समुदायाने शुक्रवारी हिंदू समाजाचा त्याग हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. हिंदू धर्मातील मान्यतानुसार घरातील देवी-देवतांच्या मूर्ती नदीत विसर्जित करण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. सदर प्रकार हा भुलोन गावात घडलेला असून राज्य सरकारच्या विरोधात देखील या परिवाराने संताप व्यक्त केलेला आहे.

बारां जिल्ह्यातील भैरवा महासभा युवा मोर्चाचे अध्यक्ष यांनी याप्रकरणी बोलताना सांगितले की, पाच ऑक्टोबर रोजी गावातील आमच्या काही व्यक्तींकडून दुर्गा मातेची आरती करण्यात आली होती मात्र त्यामुळे गावातील सरपंच प्रतिनिधी राहुल शर्मा आणि लालचंद लोढा यांनी आमच्या समुदायातील लोकांना बेदम मारहाण केली. राष्ट्रपतींपासून जिल्हा प्रशासनापर्यंत आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली होती मात्र या व्यक्तींवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही म्हणून आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी संताप रॅली देखील काढली होती मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही.

झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी मेथली नदीवर देवी-देवतांच्या मूर्ती विधिवत पद्धतीने नदीत विसर्जित करण्यात आल्या आणि त्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची प्रतिज्ञा घेऊन आम्ही हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारण्याची शपथ घेतलेलीआहे. गावात आमच्या समुदायाला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आरोपींना अटक करण्यात आली नाही तर उपविभागीय कार्यालयावर देखील आम्ही निदर्शने करणार आहोत.