पोलिसही फिर्याद घेईनात , अखेर ‘ त्या ‘ तरुणाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असे प्रकरण शेवगाव तालुक्यात समोर आले असून एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पदरीत्या मृत्यू झालेला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी एका तरुणाला जीवे मारण्याची धमकी दिलेली असून आपल्याला संरक्षण व्हावे अशी मागणी त्याने पोलिस अधीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, शेवगाव तालुक्यातील एका गावातील हे प्रकरण असून एका तरुणाची शेजारच्या गावातील एका मुलीशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि मुलीच्या घरच्यांना या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर त्यांनी त्या तरुणाला घरी बोलावून धमकी दिली होती मात्र त्यानंतरही सदर मुलगी आणि हा तरुण एकमेकाच्या संपर्कात होते. मुलीने या तरुणासोबत लग्न करण्यासाठी आग्रह धरला होता असे तिने या तरुणाला फोनवरून सांगितले होते मात्र अचानक तिचा मृत्यू झाला आणि त्याचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

सदर प्रकरणी या तरुणाने शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र सदर प्रकरणी कुणाची देखील काही तक्रार नाही अशी सबब देत पोलिसांनी या व्यक्तीची फिर्याद नोंदवून घेण्यास देखील नकार दिला. दोषी व्यक्तींवर कारवाईची मागणी या तरुणाने केली असून मुलीच्या घरच्यांकडून आपल्या जीविताला धोका आहे त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावे असे देखील म्हटले आहे .


शेअर करा