
देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आले असून दिवाळीसाठी सुट्टी दिली नाही तसेच पगारही दिलेला नाही म्हणून दोन कर्मचाऱ्यांनी मालकाचा खून केलेला आहे. पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अजय गोस्वामी असे मयत मालकाचे नाव असून त्यांनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या दोन जणांना दिवाळीला सुट्टी दिली नाही तसेच पगारही दिलेला नव्हता म्हणून संतापाच्या भरात त्यांनी हा प्रकार केला.
उपलब्ध माहितीनुसार, अजय गोस्वामी यांचे रायपूर शहरात मॅगी पॉईंट नावाचे रेस्टॉरंट असून त्यामध्ये सागर सैयान आणि आणि चिन्मय साहू हे दोघे जण काम करत होते. काम करूनही पगार मिळत नसल्याने काम सोडून जाण्याच्या बेतात असताना दिवाळीला आपला पगार मिळाल्यानंतर आपण काम सोडू असा त्यांचा विचार होता मात्र मालकाने त्यांचा पगार दिला नाही तसेच त्यांना सुट्टी देखील दिली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून मालकाने पगार दिला नाही म्हणून त्यांचे मालकासोबत वाद देखील झाले होते.
दिवाळीच्या दिवशी सुट्टीत देण्याऐवजी त्यांना काम करण्यास सांगितल्याने त्यांनी कामाला नकार दिला त्यामुळे अजय यांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारायला सुरुवात केली मात्र अखेर या कामगारांचा देखील संयम सुटला आणि त्यांनी मालक अजयला लोखंडी रॉडने मारहाण केली . अजय रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर ते फरार झाले होते. अजय यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पोलिसांनी आरोपींना अवघ्या अर्ध्या तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.