आता नोटांवर मोदींच्या फोटोची मागणी , भाजपच्या नेत्याचे ट्विट

शेअर करा

देशात सध्या चलनी नोटांवर कोणाचे चित्र असावे याविषयी वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात असून राजकीय नेत्यांकडून विधाने केली जात आहेत . या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर लक्ष्मीदेवी आणि श्री गणेशाचा फोटो लावण्याची मागणी केलेली आहे. त्यांच्या या विधानावरील वाद कमी होत नाही तोच महाराष्ट्रातील भाजप नेते राम कदम यांनी एक ट्विट केलेले असून त्यामध्ये त्यांनी पाचशे रुपयांच्या नोटांचे चार फोटो जोडलेले आहे त्यामध्ये काही महापुरुषांसोबत मोदींचा ही फोटो राम कदम यांनी लावलेला आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी पाचशे रुपयांच्या नोटेवर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो जोडत एक ट्विट केलेले असून ‘ अखंड भारत नया भारत महान भारत जय श्रीराम जय मातादी ‘ असे लिहिलेले आहे.

अरविंद केजरीवाल यांनी चलनी नोटांवर एका बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसऱ्या बाजूला भगवान गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापले जाऊ शकते असे सांगत इंडोनेशिया देशाचे उदाहरण दिले होते. आपण या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिणार आहोत असे देखील ते म्हणाले होते. केजरीवाल म्हणाले की देव देवतांचा आशीर्वाद आपल्यावर नसेल तर अनेकदा प्रयत्न करून आपल्या प्रयत्नाला यश येत नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करतो की त्यांनी चलनी नोटांवर श्री गणेश आणि लक्ष्मी यांचे चित्र छापावे.


शेअर करा