गुजरात हा वेगळा देश होणार आहे का ? महाराष्ट्रातील नेत्याने उपस्थित केली शंका

शेअर करा

गुजरात येथे भारतातील अनेक उद्योग स्थलांतरित होत असून टाटा कंपनीचा हवाई दलासाठीचा विमान निर्मितीचा सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला रवाना झालेला आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आलेले आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी देखील सरकारवर टीका केली असून इतर राज्यांवर मात्र गुजरात धार्जिण्या धोरणामुळे अन्याय होत आहे असे म्हटले आहे.

काय म्हणाले सतेज पाटील ?

डायमंड उद्योग हा आधीपासूनच सुरतला आहे आणि गुजरातमध्ये बऱ्यापैकी या उद्योगाने जम बसवला आहे. सराफा व्यापारी देखील तिथे स्थलांतरित होत असून स्टॉक एक्सचेंजचे इंटरनॅशनल ट्रेडिंग गुजरातमधून करण्याची भूमिका घेतली जात आहे हे सर्व पाहिल्यानंतर आता गुजरात हा वेगळा देश होणार आहे का ? अशी शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे. उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण करून देशाचा विकास साधणे ऐवजी देशातील सगळी संपत्ती एकाच राज्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असून इतर राज्यांसाठी हे अन्यायकारक आहे.

भारतीय हवाई दलासाठी मालवाहू विमान यांच्या निर्मितीसाठीचा 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरात इथे बडोदा येथे उभारण्यात येईल अशी घोषणा संरक्षण सचिव जयकुमार यांनी दिल्लीत केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे असल्याने रोज नवनवीन भूमिपूजन आणि घोषणांचा धडाका सुरू आहे.


शेअर करा