माहेरची मंडळींनी तिचा शोध घेताच जबर मारहाण , अन अखेर विवाहितेचा..

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना राहुरी परिसरात उघडकीस आली असून तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचा मृतदेह अखेर पिंपरी अवघड परिसरात एका विहिरीत आढळून आलेला आहे. माहेरच्या मंडळींनी आपल्या मुलीचा पैशासाठी छळ करण्यात आला आहे असे सांगितले असून सासरच्या लोकांनी तिचा खून करून तिला विहिरीत फेकून दिले असे म्हटले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, भारती राजू सोडणर ( वय 22 ) असे मयत महिलेचे नाव असून तिच्या भावाने आणि बहिणीने सासरच्या मंडळींवर खळबळजनक असे आरोप केलेले आहेत त्यामध्ये भारतीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसत असून त्यात त्यात तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला विहिरीत फेकून दिले असे म्हटले आहे. राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ असलेल्या एका विहीरीत तिचा मृतदेह आढळून आला होता.

माहेरच्या मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे लग्न झाल्यापासून तिला सातत्याने सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता. दिवाळीच्या दिवशी तिला माहेरी येण्यासाठी देखील विरोध करण्यात आला होता त्यामुळे ती सासरी थांबलेली होती. तिला भेटण्यासाठी म्हणून माहेरची मंडळी आली त्यावेळी ती बेपत्ता असल्याचे समजले आणि तिचा तपास सुरू केल्यानंतर माहेरच्या मंडळींना देखील मारहाण करण्यात आली असे देखील म्हटले आहे.