सातव्या मजल्यावरून उडी ऍक्टिव्हा गाडीवर , कोल्हापुरातील घटना

कोल्हापुरात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून जिल्ह्यातील इचलकरंजी येथे पाटील मळा परिसरात एका व्यावसायिकाने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर व्यापारी हा कापड व्यवसाय होता. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, ओम प्रकाश शंकर लाल शर्मा ( वय 42 राहणार इचलकरंजी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आलेली आहे त्याचा पोलीस तपास करत आहेत. जवाहर नगर परिसरात राहणारे ओमप्रकाश शर्मा हे कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते तसेच एका ठिकाणी ते नोकरीला देखील होते. शनिवारी सकाळी नऊ वाजता ते त्यांच्या राहत्या घरी गेले आणि त्यांनी सातव्या मजल्यावरून उडी मारली.

उडी मारल्यानंतर ते एक्टिवा गाडीवर कोसळले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नसून पोलिस प्रकरणाचा शोध घेत आहेत.