सराईत गुन्हेगार अक्षय जाधवचा अमानुषपणे खून , दोन जण ताब्यात

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली असून अंबड परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार अक्षय जाधव याचा खून करण्यात आलेला आहे. शुक्रवारी रात्री त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा पोलिसांना संशय असून प्रकरणाचा तपास सुरू आहे तर दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, तन्मय गोसावी आणि आकाश साळुंखे अशी संशयित आरोपींची नावे असून रात्री साडेदहाच्या सुमारास महालक्ष्मी नगर येथे शहर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर हे दोघे बसलेले असताना अक्षय जाधव तिथे आला आणि त्याने त्याने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरू केले त्यानंतर या दोघांनी त्याच्यावर वार केले त्यात त्याचा मृत्यू झाला . अक्षय जाधव यांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात खुनाचे, शासकीय नोकरावर हल्ला केल्याचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची देखील माहिती आहे.