‘ शिंदे साहेब पुड्या सोडू नका ‘ , रोहित पवार यांनी ठणकावले

शेअर करा

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलेला असून, ‘ ज्या व्यक्तीला हापकिन संस्था आहे की व्यक्ती हे देखील माहीत नाही . महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करतो अशा व्यक्तीला आपल्या मतदारसंघात न येण्यासाठी मी कशाला मस्का लावू . राम शिंदे साहेब पुड्या सोडू नका. खेकड्याची चाल लोक स्वीकारत नाहीत. हिम्मत असेल तर याचा पुरावा द्या आणि तुमच्या पुढच्या प्रचाराला त्यांना जरूर बोलवा मग मैदानात बघू ‘ असे आव्हान आमदार प्राध्यापक राम शिंदे यांना दिलेले आहे.

जामखेड तालुक्यातील चौंडी येथे एका कार्यक्रमानिमित्त तानाजी सावंत आले होते त्यावेळी आमदार राम शिंदे आणि तानाजी सावंत यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. राम शिंदे यांनी ,’ मंत्री महोदय जामखेड तालुक्यातील कार्यक्रमाला येऊ नये यासाठी काही जणांनी दहा-दहा फोन करून सांगितले होते ‘ अशी टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता केली होती या टीकेला रोहित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.


शेअर करा