‘ ए फॉर अर्जुन बी फॉर बलराम अन सी फॉर..’ , शाळेतील वर्णमाला वेगळीच

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून उत्तर प्रदेश येथील हे प्रकरण आहे. आत्तापर्यंत आपण इंग्रजी शाळेत शिकत असताना ए फॉर एप्पल बी फॉर बॉल शिकलो होतो मात्र आता इंग्रजी वर्णमालेची वेगळी ओळख उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे सुरू झालेली आहे . इंग्रजीच्या मुळाक्षरं मधून विद्यार्थ्यांना ऐतिहासिक आणि पौराणिक ज्ञान देण्याचा प्रकार उत्तर प्रदेशात सुरू झालेला आहे. एकीकडे काळाच्या ओघात पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना ही शाळा मात्र विद्यार्थ्यांना ऐतिहासिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

अमिनाबाद इंटर कॉलेज प्राध्यापक मुख्याध्यापक मिश्रा यांनी बोलताना यापुढे शाळेत विद्यार्थ्यांना, ‘ अर्जुन और बलराम चाणक्य अशी वर्णमाला शाळेत शिकवली जाणार आहे असे म्हटले आहे . अर्जुन हा एक महान योद्धा होता तर चाणक्य एक आदर्श शिक्षक होता. मुलांना भारतीय संस्कृतीबद्दल खूप कमी माहिती असते त्यांचे ज्ञान वाढावे हा यामागचा उद्देश आहे असे त्यांनी म्हटले आहे .