
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना मुंबईतील समोर आलेली असून एका महिला अधिकाऱ्याला आवर सचिव यांनी चक्क गाणे गाण्यास सांगितले. सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिलेली आहे. 18 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे हा प्रकार घडल्याची चर्चा असून पीडित महिलेने विभागप्रमुखांच्या दालनात गेले असता त्यांनी मला गाणे गाण्याचे सांगितले असे म्हटलेले आहे.
पीडित महिलेने या संदर्भात ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे तक्रार केली असून त्यामध्ये मॅडम बोर झाले आहे तुम्ही गाणे गा असे सांगितल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांचे जवळचे एक अधिकारी देखील यावेळी तिथे उपस्थित होते असे देखील महिलेने सांगितल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निलंबित केले असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे मात्र लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा आपण पाठपुरावा करू असे म्हटलेले आहे.