.. म्हणून आईला छतावरून ढकलले , विकलांग मुलाची अशीही क्रूरता

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना मध्य प्रदेशात समोर आली असून स्वतःचे लग्न होत नसल्याने एका तरुणाने जन्मदात्या आईची अमानुषपणे हत्या केलेले आहे. भोपाळ जवळील एका गावात ही घटना घडली असून 32 वर्षीय मुलाने केलेल्या जबर मारहाण 67 वर्षीय आईचा मृत्यू झालेला आहे त्यानंतर त्याने आईला छतावरून ढकलून दिले आणि छतावरून पडली असा देखील बनाव निर्माण केला मात्र पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, आसमा असे या महिलेचे नाव असून ती खानू नावाच्या गावातील रहिवासी आहे. तिला दोन मुले असून तिच्या थोरल्या मुलाचे लग्न झाले आहे मात्र लहान मुलगा हा मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याने त्याचे लग्न जुळत नव्हते. आपले लग्न करून दे म्हणून तो आईसोबत सतत वाद घालायचा मात्र विकलांग मुलांसाठी मुलगीच मिळत नसल्याने आई हतबल होती.

मंगळवारी रात्री महिलेचा थोरला मुलगा आताऊल्ला हा त्याच्या बायकोला आणण्यासाठी तिच्या माहेरी गेलेला होता. तिथून परत आल्यानंतर त्याने पाहिले त्यावेळी त्याची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर लहान भाऊ याने आई छतावरून पडलेली आहे असे सांगितले. मोठ्या मुलाने तात्काळ आईला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी लहान मुलगा अब्दुल याची सखोल चौकशी केली त्यावेळी त्याच्या बोलण्यात विसंगती आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने या खुनाची कबुली दिलेली आहे.


शेअर करा