म्हणून न्यायालयात चक्क ‘ मेलेल्या डासांनी ‘ भरलेली बाटली सादर

आपले म्हणणे न्यायालयासमोर घेऊन जाण्यासाठी अनेकदा गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीची शक्कल लढवत असतात असेच एक प्रकरण सध्या तळोजा कारागृहात घडलेले असून कारागृहातील दयनीय स्थिती दाखवण्यासाठी कैदी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयात मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात सादर केलेली आहे. कुख्यात गुंड एजाज लकडावाला असे या व्यक्तीचे नाव असून न्यायालयात त्याने मेलेल्या डासांनी भरलेली बाटली सादर केली होती आणि मच्छरदाणी देण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली होती मात्र न्यायालयाने त्याची मागणी फेटाळली आहे तसेच सदर व्यक्ती ओडोमास किंवा इतर औषधे वापरू शकतो असे म्हटलेले आहे.

लकडावाला हा दाऊद इब्राहिम याचा माजी सहकारी असून 2020 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती तेव्हापासून तो तळोजा तुरुंगात बंदिस्त आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली त्यावेळी मच्छरदाणी वापरण्यास त्याला परवानगी देण्यात आली होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी रद्द करण्यात आली आणि मच्छरदानी पुन्हा जप्त करण्यात आली असा दावा त्याने न्यायालयासमोर केलेला होता. गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याने आपल्याला कारागृहात डासांचा उपद्रव होत असून आपल्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे असे देखील त्याने म्हटले होते.

न्यायालयाला आपले म्हणणे पटावे म्हणून त्याने चक्क मेलेल्या डासांनी भरलेली बाटली न्यायालयात सादर केली आणि कारागृहातील कैद्यांना अशाच स्वरूपाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे असे देखील सांगितले मात्र त्याच्या म्हणण्याचा न्यायालयावर काही परिणाम झाला नाही तसेच न्यायालयाने त्याला डासांचा उपद्रव होत असेल तर तुम्ही ओडोमास किंवा इतरही औषधे त्यासाठी वापरू शकता असे सांगत मच्छरदाणी वापरण्यास मात्र नकार दिलेला आहे.