एक रुपयांचे नाणे करोडपती बनवेल का ?, ऑनलाईन फसवणुकीचा नवीन फंडा

शेअर करा

सोशल मीडियात कधी काय चर्चा सुरू होईल याचा नेम नाही अशीच एक अफवा सध्या सोशल मीडियावर जोरदार पसरत असून त्यामध्ये आपल्याकडे जर 1978 सालच्या एक रुपयाचे नाणे असेल तर तुम्हाला सहा लाख 70 हजार रुपये मिळू शकतील अशी अफवा सुरू झालेली आहे. आपली नाणी कुरियरने पाठवा असे आवाहन करण्यात येते मात्र अशी नाणी पाठवल्यानंतर कुठलाही आर्थिक लाभ होत नाही शिवाय आपल्याकडील असलेले जुने अमूल्य नाणे आपण गमावून बसतो असे समोर आले आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरात करत जुन्या काळातील नाणी आपल्याकडे असतील तर आपण ती ऑनलाईन विकून पैसे कमवून अशा स्वरूपाच्या जाहिराती अनेक वेबसाइटवर टाकल्या गेलेल्या होत्या. त्यामध्ये अनेक जणांची फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात झाली . समोरील व्यक्तीला पटावे म्हणून एक रुपयांचे दुर्मिळ नाणे काही कोटी रुपयांना विकले गेले अशा देखील जाहिराती नागरिकांना दाखवल्या जातात तसेच खोटे व्हिडिओ बनवून देखील त्यांना जाळ्यात ओढले जाते.

आपल्याकडील असलेले जुने नाणे तसेही फारसे उपयोगाचे नसल्याने नागरिक देखील कुरियरने समोरील व्यक्ती सांगेल त्या पत्त्यावर ही नाणी पाठवून देतात मात्र त्यांच्याकडील ही दुर्मिळ नाणी पुन्हा कधी त्यांना आयुष्यात मिळत नाहीत शिवाय त्याचा त्यातून काही अर्थार्जन देखील होत नाही. अनेक नागरिकांची अशाच पद्धतीने सध्या फसवणूक करण्यात आली असून नागरिकांनीही सावध राहण्याची गरज आहे.


शेअर करा