मनाचा मोठेपणा दाखवा , अजित पवार फडणवीस यांच्याकडे पाहत..

शेअर करा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे नागपूर अधिवेशन कालासाठी करण्यात आलेली निलंबन मागे घ्यावे अशी विनंती करत विरोधकांनी सोमवारी सभात्याग केला होता.

विधानसभेचे कामकाज सुरू झाले त्यावेळी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली असून अजित पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती अनावधानाने एखादी गोष्ट बोलून जाते त्यासाठी एवढी मोठी शिक्षा योग्य नाही. जयंत पाटील हे सदस्य असून संयमी आहेत. त्यांच्या निलंबनानंतर आम्ही आक्रमक भूमिका घेतलेली नाही त्यामुळे आमची विनंती आहे हा विषय संपवून टाकावा ‘.

विनंती करताना अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहत तुम्ही मनात आणले तर काहीही करू शकता फक्त मनाचा मोठेपणा दाखवा अशी मागणी आमची आहे असे म्हटले त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सध्या दिल्लीला गेले आहे ते दिल्लीवरून आल्यानंतर निलंबन मागे घेण्याबाबत त्यांच्याशी बोलू असे सांगितले.


शेअर करा