महाराष्ट्राचे एकच म्हणणे आता हटवा हे बुजगावणे

राज्यातील महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंग दोषारी यांच्या विरोधात नागपूर विधानभवनाचा परिसर विरोधकांनी चांगलाच दणाणून सोडला होता. महाराष्ट्राचे एकच म्हणणे आता हटवा हे बुजगावणे ..राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा .. चोर है चोर है राज्यपाल चोर आहे अशा घोषणांनी महाविकास आघाडीने राज्यपालांच्या विरोधात हल्लाबोल केलेला आहे.

विधानभवनात शेवटच्या दिवशी केलेल्या आंदोलनात सरकारचे आणि राज्यपालांचे बुजगावणे विरोधकांनी उभे केले होते. राज्यपालाचे बुजगावणे करण्यात आले त्याला काळी टोपी घालण्यात आली होती व त्याला भ्रष्टाचाराच्या सरकारची पाटी लावलेली होती.

आंदोलकांनी हातात काठ्या आणि टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे सरकार त्वरित हाकला अशी देखील मागणी केली. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार हे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते.