
एक अत्यंत खळबळजनक घटना औरंगाबाद येथे समोर आली असून व्यवसायाने ड्रायव्हर असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मुलीला औरंगाबाद शहरात शिक्षणासाठी ठेवले होते. परक्या शहरात ओळखीचे कोणीच नाही म्हणून आपल्याच एका मित्राला मुलीची काळजी घे असे देखील या वडिलांनी सांगितले होते मात्र या नराधमाची नियत बदलली आणि त्याने त्या मुलीला ब्लॅकमेल करत शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती सुरू केली.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता दहावीत शिकत असून आरोपी व्यक्तीने तिला ‘ तू ज्याच्यासोबत बोलतेस त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. हे सगळे पुरावे मी तुझ्या वडिलांना देईल आणि जर तू हे सगळे वडिलांना सांगू नये असे तुला वाटत असेल तर तू मला भेटायला ये आणि एक चान्स दे ‘, असे देखील तो म्हणाला.
आपल्या वडिलांच्या मित्राकडून अशी लज्जास्पद मागणी मुलीला अजिबात अपेक्षा नव्हती त्यानंतर ती प्रचंड घाबरून गेली आणि जेवण देखील बंद केले. पीडित मुलीने अखेर धीर धरून दामिनी पथकाला आपल्यासोबत घडलेली घटना सांगितली आणि त्यानंतर पथकाने आरोपीने ज्या ठिकाणी बोलावले होते त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. त्याची धुलाई केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.