
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून जालना येथे एका ठिकाणी निर्जनस्थळी गाडी थांबवून एका महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तिच्याकडील पन्नास हजार 500 रुपयांचे दागिने आरोपीने लंपास केले आहेत. भोकरदन परिसरात बोरगाव येथे ही घटना घडलेली आहे.
तक्रारदार महिला यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ,’ शनिवारी पाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार महिला या धरण पाटीवर उभ्या होत्या यावेळी अज्ञात इसम तिथे आला आणि त्याने त्यांना तुम्हाला बोरगाव जहागिर येथे सोडतो असे म्हणत गाडीवर बसवले त्यानंतर भाजीपाला खरेदी करण्याचे निमित्त करून त्याने गाडी विरेगावकडे तिथे निर्जनस्थळी गाडी उभी केली आणि त्यानंतर त्यांना दमदाटी करून त्यांच्याकडील 50 हजार 500 रुपयांचे दागिने घेऊन तेथून पलायन केले , ‘ असे तक्रारीत म्हटले आहे.