माहेरी गेल्यावर नवरा सुधारेल अपेक्षा फेल उलट ‘ भलतंच ‘ घडल

शेअर करा

एक खळबळजनक अशी घटना मुंबईत समोर आली असून पहिल्या पत्नीकडून घटस्पोट मिळत नसल्याने पतीने अखेर प्रेयसीला सोबत घेऊन पहिल्या पत्नीला संपवण्याचा प्रकार केलेला आहे. पतीने आपल्या प्रेयसीसोबत मिळून तिला फिनाईल पाजले आणि त्यानंतर तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी याप्रकरणी सुरुवातीला दखल न घेतल्याने महिलेने अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कानावर हा प्रकार घातला मात्र आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आले नाहीत.

पीडित महिलेने म्हटल्याप्रमाणे लग्न झाल्यानंतर पती आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याने आपण माहेरी जाऊन राहत होतो याचा फायदा घेत त्याचे इतर प्रेमसंबंध जुळले आणि त्यानंतर तिच्या सोबत लग्न करण्यासाठी तू मला घटस्पोट दे यासाठी तगादा त्याने सुरू केला. पतीने अनेकदा घटस्फोट देण्यासाठी आपल्याला त्रास दिला मात्र आपण त्याला घटस्फोट देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्याने आपल्याला फिनाईल पाजले आणि आपल्यावर ॲसिड हल्ला केला असा दावा पहिल्या पत्नीने केलेला आहे.

पीडित महिला ही टेलरिंग काम करत असून 2017 मध्ये तिने याच दुकानाच्या मालकाशी लग्न केले होते. तिच्या पतीने तिच्यावर अत्याचार केला म्हणून अखेर ती 2022 मध्ये माहेरी निघून गेली होती. आपण आत्तापर्यंत 17 अदखलपात्र तक्रारी दाखल केल्या मात्र पोलिसांकडून कारवाई करण्यात आली नाही. संतप्त महिलेने अखेर प्रादेशिक अतिरिक्त आयुक्त यांचे कार्यालय गाठले आपले म्हणणे मांडले आहे मात्र अद्यापही आरोपी फरार असल्याने महिलेने संताप व्यक्त केलेला आहे.


शेअर करा