झिरो मिनिमम बॅलन्सवरून बँक मॅनेजरला भोसकले

झिरो मिनिमम बॅलन्स

बँकांकडून सध्या झिरो मिनिमम बॅलन्स या नावाखाली मोठ्या प्रमाणात अकाउंट ओपन करण्यासाठी जाहिरात केली जाते मात्र प्रत्यक्षात अकाउंटला झिरोची रक्कम राहिल्यानंतर जेव्हा अकाउंटला पैसे पडतील त्यावेळी त्यातून मिनिमम अकाऊंट बॅलन्स मेंटेन करण्यात आलेला नाही म्हणून पैसे कट करण्यात येतात . झारखंड येथील रांची येथील एका बँकेत संतप्त झालेल्या एका ग्राहकाने बँक मॅनेजरवर चाकूने हल्ला केलेला आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झालेला असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

रांची येथील कांटा टोली येथील हा प्रकार एका राष्ट्रीयीकृत बँकेत घडलेला असून बँकेच्या नियमानुसार सेविंग खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवणे गरजेचे आहे मात्र चिंटू उर्फ फिरोज नावाचा एक व्यक्ती याच्या खात्यात रक्कम नसल्याने बँकेने काही दंड त्याच्याकडून नाकारलेला होता मात्र त्यासंदर्भात तो चौकशीसाठी बँक मॅनेजर यांना भेटला आणि त्यांच्यात वाद सुरू झाले.

शुक्रवारी पुन्हा एकदा बँकेत आला आणि त्यानंतर त्याने मॅनेजर सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. बँक मॅनेजर त्याला समजावून सांगत असताना त्याने स्वतःच्या जवळील चाकू काढला मॅनेजरवर हल्लाबोल केला. त्याच्या या हल्ल्यात मॅनेजर गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बँकेतील इतर ग्राहक देखील अचानक हा प्रकार घडल्याने घाबरून गेले आणि काही जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ दाखल होत सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा तपास सुरू केलेला आहे.