‘ शिक्षण झालं की लग्न करू ‘ , पुण्यात अल्पवयीन मुलीला आठवा महिना

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी परगावावरून शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आमिष तरुणांकडून दाखवण्यात येते मात्र यातूनच एक खळबळजनक अशी घटना पिंपरीत समोर आलेली असून माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आमिष दाखवून एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलगी ही सध्या आठ महिन्यांची गर्भवती असून मे २०२२ ते ऑगस्ट २०२२ पर्यंत आरोपी हा आपल्यावर अत्याचार करत होता असे मुलीचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी मुलाचे वय देखील अवघे सोळा वर्ष असून दोघेही जण अल्पवयीन आहेत. त्याने फिर्यादी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले म्हणून पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.