अन ‘ त्या ‘ बाबाचे कारनामे महाराष्ट्रात येऊन पोहचले

खळबळजनक

देशात एक खळबळजनक अशी घटना समोर आली असून राजस्थानातील भीलवाडा येथील डांगमध्ये राहणारा सर्जुदास महाराज याला एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात जळगावपर्यंत येऊन पोहोचले असून राजस्थान पोलिसांचे एक पथक चौकशीसाठी जळगाव येथे दाखल झाले होते.

सर्जुदास महाराज याच्यावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून 29 डिसेंबर रोजी राजस्थान येथील येथे त्याला अटक करण्यात आलेली आहे. जळगाव येथील एक तरुण या महाराजाच्या आश्रमात कधी कधी जात होता त्यावेळी या महाराजाची पीडित अल्पवयीन मुलीसोबत ओळख झालेली होती त्यानंतर दोघांमधील व्हाट्सअप चॅट दाखवत पीडित मुलीने हा महाराज आपल्या सोबत अश्लील चॅट करतो आणि दुष्कृत्य करतो असे देखील म्हटले होते त्यानंतर पोलिसांनी या तरुणाचा मोबाईल ताब्यात घेतला आणि तपासणी केली त्यानंतर हे प्रकरण बाहेर आले असून राजस्थान पोलिसांच्या पथकाने जळगाव येथे तपासासाठी धाव घेतली होती.