भारतातील पती हवा म्हणून आली पण गमावला जीव

प्रेमासाठी वाटेल ते असे म्हणत एका तरुणीने भारतातील पती हवा म्हणून आपला देश सोडून भारतात प्रवेश केला मात्र त्यानंतर एका दुर्दैवी घटनेत आपले प्राण गमवले आहेत. हरियाणाच्या फरीदाबाद येथे हे प्रकरण समोर आलेले असून परिसरात ही घटना उघडकीला आल्यानंतर शोकाकुल वातावरण आहे.

मयत तरुणी ही मूळची इराणची असून पलवल जिल्ह्यातील मित्रोला गावात एका तरुणासोबत लग्न करण्यासाठी तिने आपला देश सोडला होता. दिल्ली आग्रा महामार्गावर एका सोसायटीत ती राहत होती मात्र त्यानंतर तिच्या घराच्या बाथरूममध्ये तिचा मृतदेह आढळून आला. आंघोळ करण्यासाठी म्हणून ती बाथरूम मध्ये गेली मात्र तिथेच त्यानंतर तिचा मृतदेह आढळून आला .

दैनिक अमर उजाला यांनी यासंदर्भात वृत्त दिले असून आंघोळ करताना या मुलीचा श्वास कोंडून मृत्यू झालेला आहे असे म्हटलेले आहे. मयत मुलीच्या बाथरूम मध्ये गॅसचा गिझर होता तो लिक झाला आणि त्यानंतर तिचा श्वास कोंडून ती बेशुद्ध झाली आणि काही मिनिटात तिचा मृत्यूही झाला असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे. गॅस गिझरमध्ये एलपीजीचा वापर होत असतो त्यामुळे हा गॅस जर लिक झाला तर माणूस बेशुद्ध होतो आणि वेळेत उपचार मिळाले तरच जीव वाचला जाऊ शकतो मात्र या तरुणीच्या बाबत असे घडले नाही आणि त्यात तिने आपले प्राण गमावले आहेत .