इथं जगभरातून तरुणी येतात अन ‘ ब्रा ‘ लटकवून जातात कारण..

सोशल मीडियावर सध्या एका आगळ्यावेगळ्या अशा लोकेशनची जोरदार चर्चा असून न्यूझीलंड येथील हे लोकेशन आहे. जगात एकापेक्षा एक अशी अनेक ठिकाणी असून हे लोकेशन मात्र यापेक्षा काहीसे वेगळे आहे. न्युझीलँड देश सर्वात सुंदर देश म्हणून जगात प्रसिद्ध असून या ठिकाणी तरुणी चक्क स्वतःच्या अंगावरील ब्रा उतरून लटकवून निघून जातात. भारतात ठिकठिकाणी झाडाला तसेच कबरीला धागा बांधण्याची प्रथा आहे मात्र न्यूझीलंड येथील हा वेगळाच प्रकार सध्या चर्चेत आलेला आहे.

न्युझीलँडमधील ही जागा सध्या एक टुरिस्ट प्लेस झालेली असून एका मोकळ्या ठिकाणी असलेल्या दोरीवर हजारो तरुणी तिथे येतात आणि त्यानंतर तिथे त्या त्यांची ब्रा उतरून लटकवून निघून जातात. 1999 मध्ये पहिल्यांदा इथे फक्त चार ब्रावलेल्या होत्या मात्र त्यानंतर या तरुणींची सुप्त इच्छा पूर्ण झाली आणि त्यानंतर तरुणींचा मोठा लोंढा येथे येऊ लागला. कारद्रोणा ब्रा फेंस असे या ठिकाणाचे नाव आहे .

नवस बोलण्याची ही पद्धत अत्यंत वेगळी असून न्युझीलँडसारख्या प्रगत देशात हा प्रकार समोर आल्याने याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. अनेकदा लटकवून ठेवलेल्या या ब्रा चोरी झाल्याचे देखील प्रकार घडलेले आहेत मात्र तरी देखील या तरुणीच्या उत्साहात कुठलीही कमतरता आलेली नाही. न्युझीलँडमध्ये जे लोक इथे जातात ते आवर्जून या ठिकाणी भेट देतात.